Maratha Reservation : मराठ्यांनो पुन्हा एकदा मशाली पेटवा - माजी आमदार विजय गव्हाणे

'सारथी' सारखी संस्था बंद पाडणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल माजी आमदार विजय गव्हाणेंनी उपस्थित केला आहे

परभणी । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने सदर प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करण्यात आले. या निर्णयामुळे मराठा समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजपच्या काळात तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत कणखर भूमिका घेतली अ‍ॅड.सदानंद मोरे, बी एम देशमुख सारखी तज्ञ मंडळी नेमले त्यामुळे हायकोर्टात आरक्षण टिकली सुप्रीम कोर्टात सुद्धा अ‍ॅड.हरीश साळवेंसारखे तज्ञ नेमले पण नंतरच्या काळात त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते.

27 वर्ष सत्ता उपभोगवलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिली. त्यांनी लढवय्या मराठा समाजाच्या मुला-मुलींच्या मूक मोर्चावर टिंगल केली. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा सवाल माजी आमदार विजय गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजासाठी उषःकाल होता-होता काळरात्र झाली. परंतु आता मराठा समाजांनी पुन्हा एकदा मशाली पेटवण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुभाष जावळे यांनीही आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. मराठा समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी सारथी सारखी संस्था स्थापनकरून न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु आघाडी शासनाला हे देखावले नाही. त्यांनी सारथी सारखी संस्था बंद पाडण्याचे काम केले त्यामुळे या सरकारकडून दुसरी काय अपेक्षा करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: