Manmohan Sing Birthday: "भारताला डॉ.मनमोहन सिंह यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जावणत आहे"- राहुल गांधी

आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज 88 वा वाढदिवस असून, राहुल गांधी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे

नवी दिल्ली । भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज वाढदिवस आहे. कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच देशभरातील अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आज मनमोहन सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातून मनमोहन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. राहुल यांनी ट्विट करत मनमोहन सिंह यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशाला आपल्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा स्वभाव, प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पन सर्व देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. सध्याच्या घडीला त्यांची देशाला कमतरता जाणवत आहे. एक चांगला अर्थतज्ञ, रिजर्व बॅंकेचे गव्हर्नर, देशाचे वित्तमंत्री तसेच देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंह यांनी देशासाठी आपले खुप मोठे योगदान दिले आहे. असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.AM News Developed by Kalavati Technologies