माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

गुन्हा राजकीय षडयंत्र असल्याचा ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांचा आरोप

बारामती | तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे प्रमुख रंजन तावरे यांनी पतसंस्थेचे सचिव नंदकुमार खैरे यांच्या संगनमताने 51 लाख 30 हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे. याप्रकरणी माळेगाव कारखान्याचे संचालक सुरेश खलाटे यांनी तावरे व खैरे यांच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली.

2011 साली पतसंस्थेचे अध्यक्ष रंजन तावरे व सचिव नंदकुमार खैरे यांनी संगनमत करून माझ्यासह रामदास आटोळे, राजेंद्र बुरुंगले आम्हा तिघांच्या कोऱ्या कर्ज मागणी प्रकरणावर व धनादेशावर सह्या घेतल्या व आमच्या नावे प्रत्येकी 17 लाख 10 हजार रुपये असे एकूण 51 लाख 30 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. पण त्या रकमेचा अपहार तावरे यांनी केल्याचे खलाटे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, रंजन तावरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तो एक राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies