आधी पास बनवा मगच आत जा, विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी छत्रपती संभाजीराजेंना गेटवरच अडवले

मला जर प्रवेश पाससाठी थांबवले आहे तर मी आता पास बनवल्या शिवाय आत जाणार नाही - छत्रपती संभाजीराजे

मुंबई | छत्रपती संभाजीराजे आज विधानभवनात आले असता त्यांना विधानभवनाच्या गेटवर तब्बल 20 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडे विधानभवनातील प्रवेश पास नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. सध्या विधानभवनात अर्थिक अधिवेशन सुरू असल्याने विधानभवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे  कामानिमित्त विधानभवनात आले असता त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे आत जाण्याचा पास नव्हता त्यावर सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत सोडले नाही.

संभाजीराजे यांनी विनंती करून सुद्धा सुरक्षारक्षकांनी स्वीय सहाय्यकाला आत जाऊ दिले नाही. आधी पास तयार केला जाईल आणि मगच तुम्हांला आत सोडल्या जाईल असं सुरक्षा रक्षकांकडून संभाजीराजे यांना सांगण्यात आलं होतं. त्यावरून संभाजीराजे यांना 15 ते 20 मिनिटं विधानभवनाच्या गेटवर ताटकळत उभं राहावं लागलं. घडलेला प्रकार सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संभाजीराजे यांना आत सोडण्याचे आदेश दिले. मात्र संभाजीराजे यांनी मला जर प्रवेश पाससाठी थांबवले आहे तर मी आता पास बनवल्या शिवाय आत जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. तसेच मला खरोखर आनंद आहे की राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने चांगली सिस्टीम उभारली आहे. पण सर्वांनीच ही सिस्टीम पाळली पाहिजे असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies