महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू, कोरोनासह राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा

कोरोनासह राज्यातल्या इतर महत्वाचा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा सुरू आहे.

मुंबई | महाविकास आघाडीत बिघाडी होणार अशा चर्चा सुरू आहे. मात्र याच काळात आता आज महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

बैठकीला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड,अस्लम शेख उपस्थित असल्याची माहिती आहे. यासोबतच तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि अनिल परब उपस्थित आहेत. कोरोनासह राज्यातल्या इतर महत्वाचा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies