Video | महात्मा गांधींची पुण्यतिथी, प्रियंका गांधींनी शेअर केला सुंदर व्हिडिओ

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 72वी पुण्यतिथी आहे.

नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 72वी पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी 1948 दिल्लीच्या बिर्ला भवन बागेत प्रार्थना सभा संपवून निघताना नथुराम गोडसेने त्यांची गोळी झाडून हत्या केली. मात्र स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या महात्म्याच्या आठवणी व आदर आजही देशवासियांच्या मनात आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभरातून गांधीजींना श्रद्धांजली वाहिली जात आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही महात्मा गांधीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

इंदिरा गांधींची नात व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महात्मा गांधींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत महात्मा गांधी एका लहान बाळाला खेळवताना दिसत आहे. गांधीजी बाळाला मांडीवर घेऊन खेळवत आहेत, हासवत आहेत. या व्हिडिओला प्रियांका यांनी 'बापू तुम जिंदा हो, खेतों में खलिहानों में न्याय, सत्य और प्रेम के अरमानों में' असे कॅप्शन दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies