#AyodhyaVerdict : अयोध्या निकालावर महात्मा गांधींचे नातू म्हणाले, 'आज गांधी हत्येवर निकाल लागला, तर गोडसे...'

अयोध्या खटल्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तुषार गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट केले.

मुंबई । ऐतिहासिक अयोध्या खटल्याच्या निकालानंतर देशभरातून विविध प्रतिक्रियांचा ओघ सुरू आहे. याचसंदर्भात महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निकालावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, महात्मा गांधींच्या मृत्यूच्या खटल्याची सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी झाली असती तर नथुराम गोडसे हे 'खुनी आणि देशभक्त'ही ठरले असते. दरम्यान, अयोध्यामधील जमिनीच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अयोध्येत वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तुषार गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट केले की, "गांधी हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज फेरसुनावणी केली तर हाच निकाल येईल की, नथूराम गोडसे एक खुनी होते पण ते देशभक्तही होते."

त्यांनी दुसरे ट्विट केले की, "सर्वांना आनंदी करणे म्हणजे न्याय नाही, सर्वांना आनंदी करणे हे राजकारण आहे." तुषार गांधी यांनी ट्विट केले की, "आता अयोध्येचा निकाल सुनावण्यात आला आहे, तर आपण वास्तविक मुद्द्यांकडे परत वळू शकतो का ज्यांमुळे आपला देश खरोखर त्रस्त आहे?"

शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने अयोध्येमधील वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा आणि उत्तर प्रदेशमधील धार्मिक शहरात एका प्रमुख ठिकाणी नवीन मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर पर्यायी जागेचा निकाल दिला आहे. या निकालानुसार सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अध्योध्येतच पर्यायी 5 एकर जमीन देण्याचे निर्देश केंद्राला दिले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies