अमरावती जिल्ह्याला मिळू शकतात प्रमुख 3 मंत्रीपद, यांची नाव चर्चेत 

पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हा वगळता भाजपाला विधानसभा निवडणुकीत रोखण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीला फार यश आले नाही.

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. स्थानिक पातळीवर याचे पडसाद उमटू लागले आहेत. जिल्ह्यात भाजपला रोखण्याची महत्त्वाची भूमिका बजावल्यापैकी कुणाची वर्णी मंत्रिमंडळात लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. 

पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हा वगळता भाजपाला विधानसभा निवडणुकीत रोखण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीला फार यश आले नाही. त्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात आठ पैकी भाजपला केवळ एकच जागेवर यश मिळाले आहे. आघाडीने अमरावती शहरासह दर्यापूर मेळघाट या गतवेळी भाजपकडून जागा हिसकावून घेतली. विशेष म्हणजे मोर्शी मध्ये भाजपाचे माजी राज्य कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांना पराभूत करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार हे निवडून आले. तिवसामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तीन वेळा तर अचलपूरमध्ये आमदार बच्चू कडू हे चौथ्यांदा निवडून आले आहे. 

अमरावती शहरात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी यश प्राप्त करू महत्त्वाची भूमिका निभावली आहे. बडनेरा मतदार संघातून आमदार रवी राणा हे अपक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. मात्र त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यामध्ये प्रहार संघटनेचे दोन आमदार, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तीन आमदार, असून तर मोर्शीमध्ये राज्यातील एकमेव आमदार म्हणून निवडून आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार आहेत. आता राज्यातील तीनही महत्त्वाचे पक्ष असून प्रहारने  शिवसेनेला शेवटपर्यंत पाठिंबा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे न्याय व हक्कासाठी  झटणारे आमदार बच्चू कडू यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. पालकमंत्री म्हणून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचे नाव चांगलेच चर्चेत रंगले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे व राज्यांमध्ये एकमेव आमदार म्हणून देवेंद्र भुयार निवडून आले आहेत. त्यांनासुद्धा मंत्रिमंडळात मोठे स्थान मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. AM News Developed by Kalavati Technologies