लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार, ठाकरे सरकारच्या हालचाली सुरू

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पार पडला. त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड झाली यासोबतच विरोधपक्ष नेतेपदाचीही निवड करण्यात आली. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एक-दोन दिवसांत चर्चा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोण उपमुख्यमंत्री होणार याविषयी अद्यापही माहिती समोर आलेली नाही. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवे असल्याची माहिती समोर येत आहे. शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि जेष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसकडून गटनेते बाळासाहेब थोरात आणि विदर्भातील नेते नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र अजूनही या तिन्ही पक्षांना कोणकोणती खाती मिळणार, याविषयीही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार अशा चर्चा सुरू आहे. या दृष्टींनी आज बैठका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठकाही पार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies