अजित पवारांच्या हकालपट्टीविषयी शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार कराडला गेले होते.

मुंबई | राज्यात सध्या राजकीय भूकंप आलेला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तसेच शरद पवारांच्या विरोधात जाऊन भाजपसोबत हात मिळवणी केली. यानंतर अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याचे अजित पवारांनी ट्विट केले. अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार वारंवार सांगत आहे. मात्र त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार का यावर आता त्यांनी उत्तर दिले आहे.

भाजपविरोधी भूमिकेवर शरद पवार ठाम आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार कराडला गेले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय घडामोडींवर स्पष्टीकरण दिले आहे. यासोबतच अजित पवारांना राष्ट्रवादीत ठेवायचे की नाही यावरही उत्तर दिले आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार का? असा प्रश्न यावेळी शरद पवारांना विचारण्यात आला. याचे उत्तर देताना पवार म्हणाले की, 'पक्षातून काढणे हा निर्णय फक्त एखाद्या व्यक्तीचा नाही तर संपूर्ण पक्षाचा असतो. त्यामुळे याविषयी काय करायचे याचा निर्णय पक्ष घेईल.'AM News Developed by Kalavati Technologies