अजित पवारांनी पत्राचा गैरवापर केला, राज्यपालांना धोका दिला - सिंघवी

अजित पवारांनी पाठिंबा म्हणून दिलेले पत्र चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

मुंबई | राज्यात सध्या सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राजकीय भूकंप आला आहे. आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होती. आता या सर्व प्रकरणावर उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता कोर्ट निकाल देणार आहे. या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवारांनी पाठिंबा म्हणून दिलेले पत्र चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे राज्यपालांना धोका देण्यात आल्याचेही ते म्हणाले आहेत. 

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापनेच्या दाव्याचे पत्र आणि बंडखोर नेते अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे दिलेले पत्र हे दस्तावेज सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सादर करण्यात आले. आज सर्वोच्च न्यायालयात या विषयाची सुनावणी झाली. आता मंगळवरी सकाळी साडेदहा पर्यंत यावर निर्णय देणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.  

या सुनावणीवेळी सिंघवी म्हणाले की, 24 तासांमध्ये बहुमत चाचणी घेण्यात यावी. जुन्या प्रकरणाचे आदेश न्यायालयासमोर आहेत. अजित पवारांनी दिलेल्या पत्रामध्ये कोठेही भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यपालांना या सर्व प्रकरणात धोका झालेला आहे. त्यामुळे आजच्या आज बहुमत चाचणी घेण्यात यावी असे ते म्हणाले. AM News Developed by Kalavati Technologies