मोठी बातमी | जुलैमध्ये लागणार दहावी-बारावीचे निकाल; कधी ते जाणून घ्या...

महाराष्ट्रातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे रखडलेले निकाल लवकरच लागणार आहेत.

मुंबई | महाराष्ट्रातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे रखडलेले निकाल लवकरच लागणार आहेत. इयत्ता दहावीचा निकाल या महिन्याच्या 30 तारखेच्या जवळपास जाहीर होणार आहे. तर बारावीच्या परिक्षांचे निकाल याच महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान जाहीर होणार आहे. अशी अधिकृत माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोली च्या दौऱ्यावर असतांना दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 12 वीच्या परीक्षांचे निकाल हे 15 ते 20 जुलै या कालावधीत जाहीर होतील तर दहावीच्या परीक्षांचे निकाल हे महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 जुलैपर्यंत जाहीर करण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना दिली आहे.

दहावी आणि बारावीच्या निकालांच्या अधिकृत तारखा शिक्षण मंडळाकडून लवकरच अधिकृत जाहीर करण्यात येतील. या तारखा शिक्षण मंडळाच्या http://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटवर देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असं वर्षा गायकवाड यांनी म्हंटल आहे.

संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. 12 वीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरूवात झाली होती. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू झाली. सुमारे 14 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. देशात कोरोना व्हायरस दाखल होण्यापूर्वी 12 वीची परीक्षा 18 मार्च रोजी संपली. तर दहावीच्या परीक्षा सुरू होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने सर्व शाळा, महाविद्यालये तसेच परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. दहावीच्या परीक्षांचा भूगोल विषयाचा पेपर शिल्लक होता अखेर लॉकडाऊननंतर हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला.

महाराष्ट्रात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पेपर तपासणीचे काम सुरू करण्यास काहीसा उशीर झाला. अनलॉक होण्यास सुरूवात झाल्यानंतर पेपर तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती समोर येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies