दुष्काळी भागातील 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांची फी माफ, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

दुष्काळी भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची ही सवलत शासकीय, अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.

मुंबई | राज्य सरकराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी सरकारकडून माफ करण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी या निर्णयाविषयी माहिती दिली. यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी माफ केली जाणार आहे. ही फी RTGS मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला.

यापूर्वी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची प्रतिपूर्ती करताना फक्त परीक्षा फी माफ केली जात होती. मात्र प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क मात्र आकारले जात होते. आता हे शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दुष्काळी भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची ही सवलत शासकीय, अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies