सरकार-राज्यपालांमध्ये संघर्षाची ठिणगी, सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार

आता विधानसभेत यासंबंधीचं विधेयक आधी मंजूर करून घ्यावं लागणार

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे. राज्य सरकारला राज्यपालांनी मोठा धक्का दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारचा एक महत्त्वाचा आदेश फेटाळून लावला आहे. राज्य सरकारने थेट सरपंच निवडीला विरोध केला होता. हा नियम बदलण्यासाठी नवा अध्यादेश करावा असं सरकारचं मत होतं. मात्र सरकारची ही शिफारस राज्यपालांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे सरकारला आता विधानसभेत यासंबंधीचं विधेयक आधी मंजूर करून घ्यावं लागणार आहे.

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकार बदलण्याच्या तयारीमध्ये होते. थेट सरपंच निवडणूक रद्द करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू करण्यात आल्या होत्या. थेट सरपंच निवडणूक पद्धत रद्द करावी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारेच सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने 28 जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. या निर्णयानुसार अध्यादेश जारी करण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यात आली होती.

यानंतर ग्रामविकास विभागाने अध्यादेश जारी करण्याविषयीचा प्रस्ताव राजभवनाला सादर केला होता. मात्र आता राज्यपालांनी अध्यादेश काढण्यास नकार दिला आहे. अध्यादेशापेक्षा विधीमंडळात ठराव मांडण्याचा सल्ला कोश्यारींनी राज्य सरकारला दिला आहे. अधिवेशनामध्ये विधेयक मांडून मंजूर करण्याची राज्यपालांनी घेतलेली भूमिका ग्रामविकास विभागासाठी धक्कादायक आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: