खाते वाटपावर राज्यपालांचे शिक्कामोर्तब, थोड्याच वेळात जाहीर होणार अधिकृत यादी

शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप यादी राज्यपालांना पाठवली होती.

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित खातेवाटपावर आता राज्यपालांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. थोड्या वेळातच राजभावणावरून अधिकृतरित्या खाते वाटपाची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप यादी राज्यपालांना पाठवली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपालांनी आज  सकाळी मंजूरी दिली आहे. ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली. यानंतर कोणत्याही क्षणी अधिकृत यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

'सामना' मधून यादी जाहीर 

अजित पवार (उपमुख्यमंत्री): अर्थ व नियोजन
अनिल देशमुख: गृह
एकनाथ शिंदे: नगरविकास व एम एम आर डी सी
बाळासाहेब थोरात: महसूल
अशोक चव्हाण: सार्वजनिक बांधकाम
सुभाष देसाई: उद्योग
जयंत पाटील: जलसंपदा
छगन भुजबळ: अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील: राज्य उत्पादन शुल्क
जितेंद्र आव्हाड: गृहनिर्माण
धनंजय मुंडे: सामाजिक न्याय
नितीन राऊत: ऊर्जा
राजेश टोपे: सार्वजनिक आरोग्य
बाळासाहेब पाटील: सहकार
दादा भुसे: कृषी
विजय वड्डेटीवार: ओबीसी विभाग
हसन मुश्रीफ: ग्रामविकास
वर्षा गायकवाड: शालेय शिक्षण
उदय सामंत: उच्च व तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे पर्यावरण-पर्यटनAM News Developed by Kalavati Technologies