धारुर | अपंग, विधवा, वयोवृद्ध नागरीकांवर उपासमारिची वेळ, निराधारांना कोण देणार आधार

धारूर तालुक्यात रोज काम करून पोट भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

बीड | संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीने हतबल झाला आहे. याचा मोठा फटका बसला आहे तो निराधारांना अनेक वयोवृद्ध त्यांना कसले प्रकारचे काम करता येत नाही असे नागरिक घरात बसूनच आहेत. हजारो लाखो गोरगरीब यांना काय करावे काय खावे हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा आहे. संजय गांधी योजनेअंतर्गत असणाऱ्या अपंग विधवा वयोवृद्ध यांचे तीन महिन्याचे अनुदान वितरण करून शासकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांना घरपोच अनुदान वितरण करण्यात यावे यामुळे त्यांचा अन्नधान्याचा प्रश्न तरी काही काळासाठी सुटतीलअशी मागणी या योजनांतर्गत लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

धारूर तालुक्यात रोज काम करून पोट भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रोज हाताला काम आणि पोटाला आण अशी अवस्था अनेक लोकांची अवस्था दिसून येते. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचा सामना करण्यासाठी नागरिकाकडून प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य होत आहे. परंतु रोजंदारीवर सामान्यांचे हाल मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहेत. हाताला काम नसल्यामुळे आणि त्यांना आपली चूल पेटवावी कशी हा प्रश्न पडला आहे.

अशातच जेवढे वृद्ध अपंग विधवा महिला आहेत ते तर सध्या मोठ्या प्रमाणावर हतबल झाले आहेत. त्यांना काय करावं आणि खाव काय अशी अशी परिस्थिती सध्या लोकांची झाली आहे. बोलाव तरी कुणाकडे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. महत्वाचे म्हणजे निराधार लोकांना एक हजार रूपये प्रमाणे शासन पगार देत आहे. यावरच त्यांची ऊपजिवीका भागत आहे. माञ कोरोनामुळे दोन महिण्यापासुन हा पगार थांबल्याने निराधारावर ऊपासमारिची वेळ आली आहे. यांच्या मदतीसाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.AM News Developed by Kalavati Technologies