राज्यात आढळले कोरोनाचे 5 नवे रुग्ण, एकूण आकडा 136 वर

दरम्यान नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या नऊवर पोहोचली आहे.

नागपूर | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुरुवातीला मुंबई पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र आता विदर्भातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. विदर्भात कोरोनाचे आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नागपुरात काल सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना लागण झाली असल्याची माहिती आहे. तर गोंदियामध्येही एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. आता राज्यात एकूण 136 कोरोना रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या नऊवर पोहोचली आहे. यामुळे विदर्भातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. सुदैवाने राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण हे मोठ्या प्रमाणात बरे होत आहे. राज्यात सर्वात अगोदर कोरोनाबाधित असलेले पुण्यातील दाम्पत्य काही दिवसांमध्ये बरे आहे आहेत. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तसेच या 136 पैकी अनेक रुग्ण बरे होत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. असे असले तरीही कोरोनाविरुद्ध लढा संपलेला नसल्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे.

कोणत्या शहरात किती रुग्ण
मुंबई – 51
पुणे – 20
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 11
नागपूर – 9
कल्याण – 5
ठाणे – 5
नवी मुंबई – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
कोल्हापूर – 2
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
गोंदिया – 1
पनवेल – 1
उल्हासनगर – 1AM News Developed by Kalavati Technologies