Maharashtra Board Hsc Result 2020: आज बारावीचा निकाल! असे पाहा बारावीचा निकाल...

आज दुपारी 1 वाजेपासून 12 वीचा निकाल पाहू शकता

मुंबई । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे इयत्ता बारावीच्या निकालाला विलंब झाला होता. अखेर आज महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल आज लागणार असल्याचे स्पष्ठ केले आहे. त्यामुळे 12 वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची आज प्रतिक्षा संपणार आहे. आज दुपारी 1 वाजता 12 वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता 12 वीची परिक्षा 20 फेब्रुवारी ते 23 मार्च या काळात घेतली होती. यावर्षी बारावीच्या परिक्षेला 12 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यास विलंब झाल्याने निकाल लागण्यास उशिर झाला असून, आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in, www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकता.



AM News Developed by Kalavati Technologies