महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के

निकालात कोकण विभाग अव्वल, तर सर्वात कमी 88.18 टक्के औरंगाबाद विभागाचा निकाल


पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंडळातर्फे जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा राज्याचा निकाल हा 90.66 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सुमारे 4.78 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. मुलींचा एकूण निकाल 93.88 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 88.04 टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोकणचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच 88.18 टक्के लागला आहे.

हेही वाचा : Maharashtra Board Hsc Result 2020: आज बारावीचा निकाल! असे पाहा बारावीचा निकाल...AM News Developed by Kalavati Technologies