अकोल्यात आणखी 13 पॉझिटिव्ह रुग्ण; जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 428 वर

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 428 वर

अकोला | अकोल्यात आणखी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलो ऐहोत. तर एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्युची मृत्युची नोंद करण्यात आली. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या 13 रुग्णांपैकी दहा पुरुष व तीन महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण मलकापूर, तीन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित प्रत्येकी नवाबपुरा, अकोट फैल, बाळापूर रोड, शिवाजी पार्क, राऊतवाडी, सतरंजपूरा, पिंजर ता. बार्शी टाकळी, येथील रहिवासी आहेत.

दरम्यान काल (दि.25) रात्री एका 56 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. तो दि.22 रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल कालच पॉझिटिव्ह आला. त्याचा उपचार सुरु असतांना काल मृत्यू झाला.

अकोल्यातील कोरोना रूग्णांची सध्यस्थिती :
एकूण रूग्ण : 428
रोगमुक्त होऊन सुटी झालेले : 251
मृत्यु : 25
आत्महत्या : 01
सध्या उपचार सुरू असलेले : 151AM News Developed by Kalavati Technologies