कमलनाथ सरकारचे काय होणार? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

शिवराज सिंह चौहान यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे

भोपाळ | मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी संध्याकाळी स्पीकर एनपी प्रजापती यांनी राज्यपाल लालाजी यांना पत्र लिहून आमदारांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. यानंतर राज्यपालांनीही काही तासांमध्ये पत्र लिहित उत्तर दिले. त्यांनी पत्रातील मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. तसेच आमदारांच्या सुरक्षेविषयी स्पीकरवर टीका केली. राज्यपाल म्हणाले की, सुरक्षेचे काम कार्यपालिकेचे आहे. हे पत्र चुकून मला पाठवण्यात आले आहे असे वाटत आहे. यापूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्येही फ्लोर टेस्टविषयी पत्राद्वारे चर्चा झाली होती. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी एकमेकांना पत्र लिहिले आहेत.

दरम्यान शिवराज सिंह चौहान यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. भाजप नेताने कोर्टात धाव घेऊन कमलनाथ सरकारचे बहुमत लवकरात लवकर सिद्ध करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ आणि राज्यपाल लालजी टंडन यांच्यामध्ये काही पत्रांचे आदान-प्रदान केले जात आहे. अशा वेळी मध्य प्रदेशातील राजकारण कोणते वळण याकडे सर्वांचेच लक्ष आहे.AM News Developed by Kalavati Technologies