भाजपला कमलनाथांची भीती ? भोपाळमधून भाजपने आमदारांना हलवले

मध्य प्रदेशातील भाजप आपले आमदार फुटू नये म्हणुन काळजी घेतांना दिसून येत आहे

मध्यप्रदेश |  गेल्या 24 तासांत मध्यप्रदेश मधील राजकीय घडामोडी वेगाने बदलल्या आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी सुद्धा पक्षाला रामराम ठोकला आहे. एकीकडे कमलनाथ सरकार धोक्यात येत आहे तर दुसरीकडे भाजप सत्ता स्थापनेसाठी पुढे सरसावताना दिसत आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपले राजकीय रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून आता ते भाजपमध्ये सामील होणार आहे. सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसच्या 22 आमदारांनीही सुद्धा कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. एकीकडे कमलनाथ सरकार धोक्यात येत असताना, भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील भाजप आपले आमदार फुटू नये म्हणुन काळजी घेतांना दिसून येत आहे. भाजप आपल्या आमदारांना बाहेर पाठवत असल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान भाजप आपले आमदार दिल्ली, गुजरात किंवा हरियाणा येथे पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.AM News Developed by Kalavati Technologies