मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

मध्यप्रदेश | मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त झाले आहेत. शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांना डॉक्टरांनी पुढील खबरदारी म्हणून सात दिवस घरीच सल्ला दिला आहे. 25 जुलैला शिवराज कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर दहा दिवसांपासून उपचार सुरू होते.

दरम्यान चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी बोलतांना 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत राम मंदिराचा पायाभरणी करत असल्यानं 500 वर्षांपूर्वी सुरू झालेला 'महायज्ञ' आज संपत असल्याचं म्हंटल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेने आणि संकल्पमुळे ते 500 वर्षातील भारताचे महान नेते बनले असल्याचं चौहान यांनी म्हंटल आहे.AM News Developed by Kalavati Technologies