सुप्रिया सुळेंचे बाळासाहेब ठाकरेंविषयी भावनिक ट्विट

तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल...

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आज सत्यात उतरत आहे. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे. शिवतिर्थावर दिमाखदार सोहळा आज पार पडणार आहे. 6 वाजून 40 मिनिटांनी ते शपथ घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार आज स्थापन होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी शिवेसना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी भावनिक ट्विट केले आहे.

सुप्रिया सुळे ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत की, माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल.AM News Developed by Kalavati Technologies