ठाणे पाठोपाठ आता पनवेल महापालिका क्षेत्रांत 3 जुलै ते 14 जुलै दरम्यान होणार टाळेबंदी

महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काढला अध्यादेश

पनवेल | महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी देखील तीन जुलै ते 14 जुलै दरम्यान पनवेल महापालिका हद्दीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यासंदर्भात आदेश देखील काढला आहे, गेल्या काही दिवसांपासून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत, मृतांचा आकडा मध्ये सुद्धा रोज वाढ होत आहे.

कोरोनाची संख्या जवळपास अडीच हजारापर्यंत पोहोचले आहे बरे होण्याचे प्रमाण जास्त असले तरी वाढते रुग्ण ही पनवेल कर साठी चिंतेची बाब बनली आहे लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती दुकान सुरू झाल्याने कोरोना विषाणू चे संक्रमण वाढले होते गेले महिनाभरात जवळपास तीन पटीने रुग्ण वाढले आहे.

त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पनवेल परिसरात कडक लॉक डाऊन करण्यात यावा अशी मागणी पनवेल संघर्ष समिती व विरोधी पक्ष नेते आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच ज्या प्रमाणे ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका मध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता पनवेलमध्ये सुद्धा 3 जुलै ते 14 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

सध्या पनवेल मधील एकूण रुग्ण संख्या झाली 2277 आहे. तर एकुण कोरोनामुक्त रुग्ण आहेत 1392 तर 808 जण आता उपचार घेत आहे आतापर्यंत 77 जणांचा मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies