31 मे नंतर देशात पुन्हा एकदा टाळेबंदी? अमित शहांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत लॉकडाऊन 4.0. च्या समाप्तीसंदर्भात चर्चा केली होती.

नवी दिल्ली | कोरोना व्हायरस या साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाऊनचा चौथ्या टप्पा 31 मेपर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र रविवारी या लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. देशभरात 4 वेळेस लॉकडाऊन करुन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ झाली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा लॉकडाऊनचा एक टप्पा देशात लागू करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. मात्र याबाबत केद्र सरकारकडून कोणतीही माहिती मिळाली नाहीये.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्याचा एक दिवस आधी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांची लोक कल्याण मार्गावर (पंतप्रधान आवास) भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान देशात आणखी एक लॉकडाऊन करायला हवा अशी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करण्यात आलेल्या लॉकडाऊनला गतीरोधक म्हंटलं होतं. उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत असतांना लॉकडाऊन केल्यामुळं परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हंटल होतं. शुक्रवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली होती. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की कोरोनाचा आलेख वाढत आहे, त्यामुळे आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा 

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत लॉकडाऊन 4.0. च्या समाप्तीसंदर्भात चर्चा केली होती. या चर्चेत गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती काय आहे. लॉकडाऊन 31 मे सुरूच ठेवायचं का? याबाबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घेतलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा रविवारी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहे. सध्या देशातील 70 टक्के कोरोना रुग्ण दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता शहरात आढळली आहेत. त्यामुळं कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मोदी मन की बात या कार्यक्रमातून देशात आणखी दोन आठवडे लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा करु शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies