पंढरपुरात 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान लॉकडाऊन जाहीर, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी टाळेबंदी जाहीर केली आहे.

पंढरपूर | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने येत्या 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या 7 दिवसांच्या कालावधीत पंढरपूर शहर आणि त्याला लागून असलेली काही गावे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या 7 दिवसांत कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले नाही तर आणखी 3 दिवस लॉकडाऊन वाढू शकतो अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या संसर्गच्या पहिल्या तीन महिन्यात पंढरपूरमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता मात्र गेल्या महिन्याभरापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 500 च्या वर पोहचली आहे. रुग्णांच्या संख्येत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कार्यकाळात चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान दूध, मेडिकल व हॉस्पिटल वगळता कोणालाही परवानगी नाही संपूर्ण कडक संचारबंदी असणार आहे.

या पत्रकार परिषद प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सोलापूर चे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदि उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies