मोठी बातमी ! महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत संकेत दिले होते.

मुंबई | कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात करण्यात आलेला लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र हा लॉकडाऊन जरी वाढवण्यात आला असला तरी सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. त्याच वेळेस त्यांनी परत एकदा लॉकडाऊन वाढवणार असल्याचे संकेत दिले होते.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून राज्यात दररोज 5 हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याच निर्णय सरकारकडून घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे.30 जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे 30 जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असं राज्य सरकारने सांगितलं आहे. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies