पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन : उपमुख्यमंत्री अजित पवार

13 जुलै ते 28 जुलैपर्यत राहणार कडक लॉकडाऊन

पुणे । पुणे शहारात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा हा सुरुच आहे. या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली. या बैठकीनंतर पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याची घोषणा अजित पवार यांनी दिली आहे. 13 जुलै ते 28 जुलैपर्यत कडक लॉकडाऊनची घोषणा दोन्ही शहरात असणार आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या पुण्यात झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासुन शहरात हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी 1618 रुग्ण वाढले होते. तर गुरुवारी ही संख्या 1803 वर पोहोचली. पिंपरी-चिंचवड परिसरात रोज सुमारे पाचशेच्या आसपास रुग्ण सापडत असल्याने शहरवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पुर्वी दिवसागणित 50 रुग्ण सापडायचे पण गेल्या दोन तीन दिवसांपासुन ग्रामीण भागातही सरासरी 150 च्या आसपास रुग्णसंख्या वाढत आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 34399 तर पुणे शहरातील रुग्णसंख्याही 25 हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies