#RajThackeray । निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही - राज ठाकरे

सोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको - राज ठाकरे

मुंबई । मनसेच्या नव्या झेंड्याचे आज पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात अनावरण झाले. तसेच मनसेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची निवड करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील बदलाची आणखी एक बदल केला आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष म्हणून निवडा अशी साद घातल्यानंतर पक्षाच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेल अस मत त्यांनी यावेळी मांडले. 9 मार्चला वर्धापन दिन आहे. त्यानंतर 23 मार्चला गुढीपाडवा निमित्ताने शिवतीर्थावर जाहीर सभा होईल. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. जे काम उत्तम करालं, ते सोशल मीडियावर टाका, कारण ते लोकांपर्यत पोहोचलं पाहिजे. यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात. या वाक्याचा त्यांनी पुनउच्चार केला.

ज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी. मला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल. अस मत त्यांनी यावेळी मांडले. ज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी. मला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल. अस मत त्यांनी यावेळी मांडले. ही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा . असही यावेळी राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.AM News Developed by Kalavati Technologies