गुगल, फेसबुक आणि आइटी इंजिनियर्सनी लिहले CAA च्या विरोधात पत्र

पत्रात या कायद्याचे फासिस्ट लॉ असे वर्णन केले आहे.

नवी दिल्ली ।  भारत आणि परदेशात गुगल, उबर, अॅमेझॉन आणि फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये काम करणारे भारतीय व भारतीय वंशाचे आयटी अभियंत्यांनी नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) च्या विरोधात पत्र लिहून आपला विरोध दर्शविला आहे. या पत्रात या कायद्याचे फासिस्ट लॉ असे वर्णन केले आहे. या पत्रावर 150हून अधिक अभियंत्यांनी सही केली आहे.

अभियंत्यांनी अल्फाबेटची सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टची सत्य नाडेला, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यासारख्या उद्योग नेत्यांना कायद्याचा जाहीर निषेध करण्याचे आवाहन केले आहे. 'टेक अगेंस्ट फॅसिझम' नावाच्या पत्राद्वारे अभियंत्यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या गटात अभियंता, संशोधक, विश्लेषक आणि डिझाइनर आहेत. या गटामध्ये अमेरिका, ब्रिटन, इस्राईल आणि भारतात काम करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies