डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवूया, मायेचा हात फिरवूया - जितेंद्र आव्हाड

3 ट्रक जीवनाश्यक साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले

ठाणे | कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी प्रत्येकाने जमेल तशी मदत करावी. हजार रुपयात आपण एक संसार उभा करू शकतो. आपल्या आया-बहिणींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबूयात. मायेचा हात फिरवूया. त्यांना आज माहेरची गरज आहे. आपण माहेर म्हणून उभे राहूया असे आवाहन आमदार आव्हाड यांनी केले.

सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीमुळे हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी ठाणेकरांनी हातभार लावावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या संघंर्ष या संस्थेच्या माध्यमातून केले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज 3 ट्रक जीवनाश्यक साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies