नाशिकमध्ये बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्हीत कैद

व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही.

नाशिक | कोरोना व्हायरसच्या थैमानामुळं सध्या देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात रस्ते ओस पडले आहे. त्यामुळं अनेक वन्य प्राणी निवासी भागात रस्त्यावर फिरतांना दिसत आहे. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. शहरातल्या इंदिरा नगर परिसरात बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याने या भागात आतापर्यंत दोन जणांवर हल्ला केला असून या हल्ल्यात दोघेही जण गंभीर जखमी झाले आहे. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान बिबट्य़ाने केलेल्या हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या व्हिडिओमध्ये बिबट्या एका व्यक्तीवर इतक्या वेगाने हल्ला करत आहे की सदरील व्यक्तीला पळ काढण्याची संधीच मिळत नाही. व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. बिबट्यानं अचानक केलेल्या हल्ल्यात सदरील व्यक्ती हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनं संपुर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान वनविभागचे कर्मचारी या बिबट्याच्या शोधात असून अद्यापही हा बिबट्या जेरबंद झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies