जाणून घ्या; भारतात कधी येणार कोरोनाची पहिली लस; कोण-कोणत्या स्वदेशी कंपन्या तयार करत आहेत 'को-वॉक्सिन'

जगभरात प्रभावी कोरोना लस तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच जगभरातील इतर देशांसोबतच भारतातही कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

डेस्क स्पेशल । जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातले आहे. या भयावह विषाणूने कित्येक जणांना ग्रासले आहे. तर अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या महाभयंकर विषाणूवर संजीवनी ठरेल अशी लस शोधण्याचं काम शास्त्रज्ञ करत आले. सुमारे जगातील दिडशे पेक्षा जास्त देशात कोरोना लसीवर संशोधन करण्यात येत आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन या देशांसोबतच भारतातही कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतात कोरोना लसीची चाचणी सुरु आहे. देशात हैदराबादमधील भारत बायोटेक आणि अहमदाबाद येथील जायडस कॅडिला कंपनीने लसीची मानवी चाचणी सुरु केली आहे. भारतात कोरोना विळखा वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात सुमारे 60,000 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे भारतात कोरोना लसीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे.

जाऊन घेऊया; कोण-कोणत्या औषधनिर्मीत कंपन्या तयार करत आहे कोरोनाची लस !

भारत बायोटेक

दिल्ली, पटना, भुवनेश्वर, चंदीगडसह देशाच्या 12 भागात या देशातील पहिल्या संभाव्य अँटी-कोरोना को-वॉक्सिनची मानवी चाचणी सुरू आहे. को-वॉक्सिनची निर्मिती भारत बायोटेक, आयसीएमआर आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी केली आहे. हैदराबाद येथे ही कंपनी कोरोना लसीची निर्मिती करत आहे.

जायडस कॅडिला

भारतीय औषध कंपनी जायडस कॅडिलाने प्लाज्मिड डीएनए वॅक्सिन 'जायकोवी-डी'चं 6 ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरक्षित आणि यशस्वी झाल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, पहिल्या टप्प्यात क्लिनिकल परीक्षणात वॅक्सिनचा डोस देण्यात आलेले वॉलेंटिअर्सची तब्बेत उत्तम आढळून आली. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल 3 जुलै पासून सुरु करण्यात आलं होतं

अरविंदो फार्मा

हैदराबादमधील भारतीय औषध कंपनी अरविंदो फार्मा सुद्धा कोरोनावरील लसीची संशोधन करत आहे. यासाठी कंपनीला जैव प्रौद्योगिक विभागाकडून आर्थिक मदतही मिळाली आहे. कंपनी न्यूमोकोकल कंजुगेट वॅक्सिन (पीसीवी) विकसित करत आहेत. कंपनीने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील संशोधन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल डिसेंबर 2020 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. ही लस 2021 च्या अखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.

या व्यतिरिक्त सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानेही लस तयार केली असून, त्याची सुद्धा चाचणी अखेरच्या टप्प्यात आहे. सीरम इंस्टीट्यूट आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ ह्या लसीवर संशोधन करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies