विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबाद दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची करणार पाहणी

राज्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहे

उस्मानाबाद । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सकाळी 10 च्या सुमारास ते पाहणीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील गावसुध येथे गेले. त्यानंतर फडणवीस यांनी तुळजापूर तालुक्यातील बेगडा व आपसिंगा, कात्री या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे नुकसानीचा पाढा वाचला.

शेतकऱ्यांनी खराब झालेला पिके फडणवीस यांना दाखवली व लवकरात लवकर मदत मिळवून द्या अशी मागणी केली. फडणवीस यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली. दरम्यान राज्यात परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांसह देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies