"प्रधानमंत्री विद्यार्थी बचाव, पटवर्धन हटाव" विद्यार्थ्यांसाठी ट्विटर मोहिम सुरू

युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची हकालपट्टी करण्याची राष्ट्रीय विद्यार्थी भारती अध्यक्षा मंजिरी धूरी यांची मागणी

ठाणे । आधुनिक द्रोणाचार्य बनून, विद्यार्थी हिताची परवा न करता, आपल्या पदाचा दुरूपयोग करून सप्टेंबरमध्ये विद्यापीठांच्या मुलांना परीक्षा सक्तीच्या करून आपण कलम कसाई असल्याचे सिद्ध केलेल्या युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची हकालपट्टी करण्याची मागणी विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धूरी यांना मेलद्वारे व ट्विटर द्वारे केली आहे. परंतु प्रधानमंत्र्यांनी प्रतिसाद न दिल्याने "प्रधानमंत्री विद्यार्थी बचाव, पटवर्धन हटाव" अशी ट्विटर मोहीम सुरू केल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षा धूरी यांनी दिली आहे.

गेले अनेक दिवस विद्यार्थी भारती संघटना वेगवेगळ्या समाजमाध्यमातून अंतिम सत्राच्या परीक्षा सरसकट रद्द कराव्यात व सर्व विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा, तसेच एटीकेटी व बॅकलॉगच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जावे, विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप मिळावी, ऑनलाईन सत्र बंद करावेत अशा काही मागण्या घेऊन केंद्र सरकारला, युजीसी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र पाठवत आहे.

परंतु त्यावर काहीच प्रतिक्रिया येत नसल्याने विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी या 16 जुलैला उपोषणाला बसल्या असताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व सुप्रियाताई सुळे यांच्या आश्वासनाने उपोषणाला स्थगिती दिली असली तरीही 1 ऑगस्टपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर, पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे मंजिरी धूरी यांनी सांगितले. तसेच तो पर्यंत देशातील त्या सर्वच विद्यार्थ्यांना ज्यांना परीक्षा रद्द कराव्यात असे वाटत असेल तर त्यांनी या लढ्यात सामील होऊन मोठ्या प्रमाणात सरकारला ट्विटर भेजो मोहिमेत सामील होण्याचे आव्हान केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies