मुख्यमंत्र्याच्या हस्ते महाजॉब पोर्टलचे लोकोर्पण !

मराठी तरुणांसाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल

मुंबई । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज 'महाजॉब' या पोर्टलचे उद्घाटन केले आहे. उद्योदमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हा पोर्टल तयार करण्यात आला आहे. या मुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोरोनामुळे देशात आणि राज्यात लॉकडाउन लागु करण्यात आला होता. त्यामुळे अनेक उद्योदधंदे बंद पडले होते, तसेच अनेक तरुणांच्या नौकऱ्यासुद्धा गेल्या होत्या. पण आता राज्यात 65 हजार उद्योग सुरु झाले असुन, आणखी नवे उद्योग राज्यात येत आहेत. राज्य सरकारने नुकतेच देश-विदेशातील कंपन्याशी 17 कोटींचे करार सुद्धा केले आहे असे मुख्यमंत्र्यानी सांगितले आहे.
रोजगारच्या शोधात असणाऱ्यांना तरुणांना ही एक मोठी संधी मिळाली आहे.

इच्छुकांनी http://www.mahajobd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरायची आहे.AM News Developed by Kalavati Technologies