लातूर | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह मुलाला कोरोनाची लागण

स्वत: अभिमन्यूू पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे

लातूर | जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. आजच्या दिवशी शहरात कोरोनाचे 21 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह त्यांच्या मुलाचीही समावेश आहे. अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत ही माहीती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे. की "मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत".

लातूर मधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही. एक नम्र विनंती आहे, मागच्या ४-५ दिवसांत माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी. काही महत्त्वाचे काम असल्यास मी मेसेजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आपण सर्वांनीच स्वतःची व कुटुंबियांची‌ काळजी घ्यावी. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने लवकरच बरा होऊन जनसेवेत रूजू होईल असा विश्वास आहे.



AM News Developed by Kalavati Technologies