लातूरात कोरोनाचा कहर; आज तब्बल 53 नवे रुग्ण आढळले

लातूरात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे

लातूर | शहरात कोरोना व्हायरसचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. आज जिल्ह्यात तब्बल 53 नवे कोरोना पाँझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 612 इतकी झाली आहे. यामध्ये 322 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.AM News Developed by Kalavati Technologies