स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा

लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती

मुंबई | स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती शनिवारी मंगेशकर कुटुंबीयांतर्फे नियुक्त जनसंपर्क सेवेतर्फे देण्यात आली आहे.

लतादीदींना रविवारी मध्यरात्रीनंतर श्वसनाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. तेव्हा त्यांच्या ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवरून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे व प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वृत्त देण्यात आले. चाहत्यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेला यश आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. लतादीदींच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे.

लतादीदींनी आपल्या सुमधूर आवाजाने देशाला मंत्रमुग्ध केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून लतादीदी आपल्या मधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 28 सप्टेंबर 1929 मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत 25 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.AM News Developed by Kalavati Technologies