'लष्कर-ए-तोयबा'च्या कुख्यात दहशतवाद्याला अटक, मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

पोलिसांकडून सेक्युरिटी फोर्सच्या मदतीने दहशतवादी निसार अहमद डार याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली | दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या हल्ल्याचा कट श्रीनगर पोलिसांकडून सेक्युरिटी फोर्सच्या मदतीने उधळून लावण्यात आला आहे. निसार अहमद डार (वय-23, रा.वहाब पर्रे मोहल्ला) असे कुख्यात दहशतवाद्याचे नाव आहे. या दहशतवाद्याला शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली आहे. श्रीनगर पोलिसांकडून शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कुल्लन गांदरबलमध्ये झालेल्या चकमकीमध्ये निसार अहमद डार हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या चकमकीमध्ये एका पाकिस्तानी दशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून निसार अहमद डार हा श्रीनगरमध्ये लपून बसला होता. सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्याचा त्याचा कट होता. पोलिसांनाही याविषयी गोपनिय माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांकडून सेक्युरिटी फोर्सच्या मदतीने दहशतवादी निसार अहमद डार याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठाही पोलिसांनी जप्त केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies