परभणी |  जिल्हा रुग्णालयात सोयीसुविधांसह साहित्याचा अभाव; संतप्त परिचारिकांनी प्रशासनास धरले धारेवर

परिचारिका संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

परभणी |  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका व ब्रदर्स यांना संरक्षणाच्या दृष्टीने पुरेसे साहित्य नसल्याने राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईत एक योध्दा म्हणून वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचार्‍यांसह परिचारिका संशयितांसह कोरोनाबाधित रुग्णांची गेल्या दोन महिन्यांपासून सेवा करीत आहेत. वैद्यकीय तपासण्यांसह योग्य तो औषधोपचार उपलब्ध करीत आहेत. असे असतांना आरोग्य विभागाद्वारे या अधिकार्‍यांसह कर्मचारी-परिचारिकांना मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने संतप्त परिचारिकांनी रुग्णालय प्रशासनास धरले धारेवर आहे. रुग्णांची सेवा करण्यासाठी आम्हाला संरक्षणाच्या दृष्टीने साहित्य पुरवण्यात यावे तसेच जिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेला स्टाफ हा वेगळा ठेवावा व क्वारंटाईन विभागात कार्यरत असणारा स्टाफ वेगळा ठेवावा, राहण्याची व जेवणारी व्यवस्था करावी, एचसीओ टॅब देण्यात यावे, स्टाफला स्वतंत्र बेड तयार करून द्यावे व आयटी येथील कोविड रूग्णालयात जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी, स्टूडंट नर्सेसेंना विमा संरक्षण द्यावे आदी मागण्या राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies