कोरी पाटीचा कोरोना विशेष व्हिडीओ व्हायरल, थेट रोहित पवारांकडून दखल

लोकांच्या प्रबोधनाखातर सातारा प्रशासनासोबत दोन व्हिडीओ जारी केले

मुंबई | सध्या संपूर्ण जगावर कोरोनाने थैमान घातले आहे, प्रत्येक राज्य तथा देश आपापल्या परीने या विषाणूपासून लोकांचे कशा प्रकारे संरक्षण होईल यावर विशेष काम करत आहे. महाराष्ट्रातदेखील विविध प्रकारे लोकांना या विषाणूबद्दल माहिती देत आहेत . महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हे आपापल्या पातळीवर लोकांच्या प्रबोधनासाठी काम करत असून यात सर्वात मोठं योगदान हे सोशल मीडियाचं आहे.

गावाकडच्या गोष्टी या आपल्या वेबसिरीज मार्फत नेहमीच लोकांचे मनोरंजन तसेच प्रबोधन करणारे कोरी पाटी प्रोडक्शन तसेच सातारा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इतका प्रभावी आहे की याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या व्हिडीओ ची दखल घेत त्यांनी आपल्या पर्सनल सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये शहरी भागातून आपापल्या गावी परतलेल्या लोकांबद्दल सांगणारी प्रबोधनरुपी कथा मांडण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकं कोरोनाकाळात आपला बचाव कसा करतात याबद्दल सांगण्यात आलेलं आहे.

गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीज चे दिग्दर्शक नितीन पवार सांगतात की, "आपल्या कलेने नेहमीच लोकांचं मनोरंजन तसेच प्रबोधन करण्याचं काम आम्ही करत आलो आहोत. सातारा प्रशासनाने या कोरोनाकाळात सातारकरांचे प्रबोधन करण्याची संधी दिली याबद्दल आम्ही ऋणी आहोत. लोकांच्या प्रबोधनाखातर सातारा प्रशासनासोबत दोन व्हिडीओ जारी केले आहेत, आमच्या कामाची दखल आमदार रोहित पवार यांनी घेतली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. "AM News Developed by Kalavati Technologies