कोकण रेल्वेतील दोघांना उत्कृष्ट कार्यासाठी पोलीस पदक जाहीर

सहायक सुरक्षा आयुक्त पी.पी जॉय आणि उपनिरीक्षक देवकुमार गौंड यांचा समावेश

नवी दिल्ली । रेल्वेची सुरक्षा करणाऱ्या रेल्वे पोलीस दलातील उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 18 रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून यामध्ये कोकण रेल्वेतील दोघांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा विशेष दलासाठी आज राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर केली आहेत. विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक दिले जाणार आहेत. उत्कृष्ट सेवेसाठी रेल्वेतील 15 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. राष्ट्रपती पोलीस पदक विशिष्ठ सेवेसाठी 2 रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. तर पोलीस पदकासाठी 1 पोलीस कर्मचाऱ्याचे नाव जाहीर झाले आहे. कोकण रेल्वेतील दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये सहायक सुरक्षा आयुक्त पी.पी जॉय आणि उपनिरीक्षक देवकुमार गौंड यांचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies