कोल्हापूर | पतीच्या हल्ल्यात पत्नी आणि मेव्हणा ठार

अडकित्याच्या सहाय्याने केलेल्या हल्ल्यात पत्नी आणि मेव्हण्याचा मृत्यु झाला आहे.

कोल्हापूर |  राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे ग्रामपंचायत आवारात पतीनेच पत्नी आणि मेहुण्यांवर खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. अडकित्याच्या सहाय्याने केलेल्या हल्ल्यात सदरील पत्नी आणि तिचा भाऊ दोघेही गंभीर जखमी झाले होते. या दोघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच दोघांचाही मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार माजी ग्रामपंचायत सदस्य असलेली महिला मांजबाई कावणेकर आणि पती सदाशिव कावणेकर यांच्यात कौटुंबिक वाद होता. आज ग्रामपंचायत कार्यालयात महिला आपला भाऊ केरबा येडके यांच्यासोबत उतारे काढण्यासाठी आल्याची माहिती सदरील महिलेच्या पतीला मिळाली यावेळी उतारे काढण्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नंतर झालेल्या वादावादीत पतीने मेहुणा आणि बायकोवर सपासप वार केले. आणि घटनास्थळावरून पसार झाला. अतिरक्तस्राव झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. नागरीकांनी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्यार जप्त केले असून पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस आरोपीच्या शोधात आहे.AM News Developed by Kalavati Technologies