कोरोनाच्या धास्तीने मुंबईहून गावाकडे परततांना काळाचा घाला; आई वडिलांसह चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू, कोल्हापूरच्या पाटील कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

कोल्हापूर | कोरोना व्हायरसच्या धास्तीने मुंबईहून, गावी परतत असतांना आई-वडिलांसह लहान मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्जेराव भीमराव पाटील (वय 33) पुनम सर्जेराव पाटील (वय 27) अभय सर्जेराव पाटील (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. मयत व्यक्ती जांबुर ता शाहूवाडी येतील रहिवासी होते. खाजगी नोकरीनिमित्त ते मुंबईच्या डोंबिवली परिसरात राहत होते.

दरम्यान राज्यात कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे हे कुटुंब आपल्या मूळ शाहूवाडी तालुक्यातील जांबुर या गावी मोटरसायकल वरून प्रवास करत होते. कराडजवळ आल्यानंतर मोटारसायकल घसरून ते पडले असता. तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोना व्हायरसची दहशत असतांना तिघांच्या झालेल्या अपघाती मृत्यूने संपूर्ण जांबुर गावावर शोककळा पसरली आहे.AM News Developed by Kalavati Technologies