कोल्हापूरात संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

शोध आणि बचाव कार्यासाठीचे लागणारे साहित्य आज पंचगंगा नदी काठी आणून त्याची चाचणी घेण्यात आली.

कोल्हापूर | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीन पावसाळयामध्ये उद्भवणाऱ्या पुरस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. शोध आणि बचाव कार्यासाठीचे लागणारे साहित्य आज पंचगंगा नदी काठी आणून त्याची चाचणी घेण्यात आली. आपत्ती काळात नदी पात्रातून नागरिकांची कशी सुटका करावी याचे प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आली. मे महिन्यातील कडक उन्हाळा संपत आला असून आता पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळ आतापासूनच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नियोजनाच्या कामाला लागली आहे. त्यानुसार आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेन पंचगंगा नदीमध्ये मोटरबोटीचे प्रात्यक्षिक आणि चाचणी घेतली. आप्पती काळात नदी पात्रातून नागरिकांची कशी सुटका करावी याचे प्रात्यक्षिकही करण्यात आली. यावेळी यांत्रिक बोटीसहित आपत्तीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याने नदी पात्रात आपत्ती सेवेबाबत माहिती देण्यात आली.

संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आणि सजग ठेवण्यात आल्या असून आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजनांमध्ये शोध आणि बचावकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळ आज यातील मोटारबोटची पंचगंगा नदीत चाचणी घेण्यात आली. तसेच शोध आणि बचाव कार्यासाठीच्या लागणाऱ्या आवश्यक साहित्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आली. हे साहित्य आज पंचगंगा नदीकाठी चाचणीसाठी ठेवण्यात आल होत. गेल्या वर्षी महापुराची मोठी भीषणता होती. यावर्षी मात्र अशी आपत्ती ओढवल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचही यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies