आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत कोहली अव्वल तर रहाणेची 7 व्या स्थानावर घसरण

चेतेश्वर पुजारा (791) याने चौथे स्थान कायम राखले आहे

स्पोर्ट्स डेस्क ।भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यावर्षी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. आयसीसीच्या ताज्या जागतिक क्रमवारीत अजिंक्य रहाणे एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर आहे. कोहलीचे 928 रेटिंग गुण असून ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या तुलनेत तो 17 गुणांनी पुढे आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (864)तिसर्या स्थानावर आहे.

चेतेश्वर पुजारा (791) याने चौथे स्थान कायम राखले आहे. परंतु रहाणे सातव्या स्थानावर घसरला. पाकिस्तानच्या बाबर आझमने त्यांची जागा घेतली आहे. श्रीलंकेविरूद्ध कराची येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात आजमने नाबाद शतक आणि 60 धावा केल्या यामु्ळे तीन स्थानांनी झेप घेत तो सहाव्या स्थानावर आला आहे. हे त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे.

भारताच्या पहिल्या 20 फलंदाजांमध्ये सलामीवीर मयंक अग्रवाल (१२ वे) आणि रोहित शर्मा (15 व्या) यांचा समावेश आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने सहावे स्थान कायम राखले आहे. दुखापतीमुळे बुमराह दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून बाहेर आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल आहे.

कसोटी अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत 360 गुणांसह आघाडीवर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (216), पाकिस्तान (80), श्रीलंका (80), न्यूझीलंड (60) आणि इंग्लंड (56) यांचा नंबर येतो.AM News Developed by Kalavati Technologies