Independence Day Special: भारतीय राष्ट्रध्वजाच्या निर्मितीची रंजक कहाणी...

पाहा भारताच्या राष्ट्रध्वजनिर्मितीच्या Unknown Facts

भारतीय राष्ट्रध्वजाला 'तिरंगा'ही म्हटले जाते. कारण हे यात केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे. तथापि, बहुतांश जणांना माहिती नाही की, सध्याचा राष्ट्रध्वज पहिला नाही, यापूर्वी भारताचे अनेक ध्वज होते. या सर्वांतून तिरंगा बनण्याची कहाणी रंजक आहे.

भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक (ग्रीन पार्क) कलकत्त्यात फडकवण्यात आला होता. या शहराला आता कोलकाता म्हणून ओळखले जाते. हा ध्‍वज लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या आडव्या पट्ट्यांनी बनलेला होता.

दुसरा ध्वज 1907 मध्ये पॅरिस येथे मादाम कामा आणि त्यांच्यासह काही क्रांतिकारकांनी फडकवला होता. हासुद्धा पहिल्या ध्वजासारखाच होता. यातील सर्वात वरच्या पट्टीवर सात तारे सप्‍तऋषींना दर्शवत होते, तर एक कमळ होता.

तिसरा ध्वज साल 1917 मध्ये डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान टिळकांनी होमरूल चळवळीदरम्यान फडकावला होता. या ध्वजात 5 लाल आणि 4 हिरव्या आडव्या पट्ट्या एकानंतर एक होत्या. याशिवाय सप्तऋषींच्या रूपाने सात तारेही यावर होते. डावीकडे वरच्या बाजूला युनियन जॅक होता. तर उजव्या कोपऱ्यात पांढरा अर्धचंद्र आणि ताराही होता.

चौथा ध्वज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सत्रादरम्यान 1921 मध्ये बेजवाडा येथे फडकवण्यात आला होता. हा लाल आणि हिरव्या अशा दोन रंगांनी बनलेला होता. जो हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायांना दर्शवत होता. गांधीजींनी सूचना दिली होती की, भारतातील इतरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यात एक पांढरी पट्टी आणि एक चरखा असला पाहिजे.

पाचवा ध्वज सन 1931 मध्ये फडकावण्यात आला होता. हा ध्‍वज भारतीय राष्ट्रीय सैन्याचे संग्रामचिन्हही होता.

यानंतर सध्याचा तिरंगा 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला होता. हा तिरंगा आंध्र प्रदेशातील पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. याच्या मधोमध अशोक चक्रही बनलेला आहे. ज्यात 24 आरे असतात. तिरंग्याला इंडियन नॅशनल काँग्रेसने भारताच्या स्वातंत्र्याच्या काही काळ आधीच स्वीकारले होते.AM News Developed by Kalavati Technologies