मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण; राज्यभरात 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

'नवभारताच्या निर्मितीसाठी अविश्रांत काम करण्याचा संकल्प, हाच स्वातंत्र्यदिनाचा संदेश' -मुख्यमंत्री

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले. यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी खास ट्विट केलं. 'नवभारताच्या निर्मितीसाठी अविश्रांत काम करण्याचा संकल्प, हाच स्वातंत्र्यदिनाचा संदेश' असं या ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणाले. यासह त्यांनी तमाम भारतीयांना 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1161843624985812992

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधन केले. यावेळी सीएम फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलेल्या तिन्ही सैन्यदलांचे आभार मानले. पूरग्रस्तांना तातडीने मदत केली जाईल, संपूर्ण महाराष्ट्र पाठीशी उभा राहिल्याचेही ते म्हणाले. मागच्या 5 वर्षांत दीनदलित, गरीब, आदिवासी यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच मागच्या पाच वर्षांत शेतीमध्ये विक्रमी दीड लाख कोटींची गुंतवणूक आणून शेतकऱ्यांना थेट मदतीचे काम केले. मराठवाडा, विदर्भ दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व प्रकल्प केंद्राच्या मदतीने लवकरात लवकर पूर्ण करून हा भाग दुष्काळमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मागच्या पाच वर्षांच्या काळात या सरकारनं केलं. मराठा आरक्षण, धनगर समाजासाठी विविध सोयी, ओबीसींसाठी विविध योजना राबवून सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने साध्य करण्याचा प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies